शबनम न्यूज / चिंचवड
पिंपरी चिंचवड मध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी आज औंध जिल्हा रुग्णालय येथे कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सर्व 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना आव्हान केले आहे की ,नागरिकांनी आपापल्या भागातील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. जेणेकरून आपण वाढत्या करोना महामारीवर प्रतिबंधक उपाययोजना करण्यास मदत होईल. ‘ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत लस घेऊन सुरक्षित राहुयात ,आणि इतरांनाही लस घेण्यास प्रोत्साहन करावे. असे आवाहन आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. १४) सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात जाऊन कोविड (कोरोना) प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी आमदार जगताप यांनी लस घेण्यास पात्र पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांनी लस टोचून घ्यावी. कोरोना विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी डॉक्टर, वैज्ञानिक आणि इतर कोरोना योद्ध्यांनी चांगले कार्य केले आहे. या सर्वांचे कार्य उल्लेखनीय आहे. आता आपण सर्वांनी एकत्रितपणे मिळून आपला देश कोरोना मुक्त करूया, असे ही आवाहन त्यांनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज कोरोनाला प्रतिबंध करणारा लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी भारत बायोटेकची को-व्हॅक्सिन लस घेतली आहे. औंध जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने आमदार जगताप यांना कोरोनाची लस दिली.
दरम्यान, देशभरात कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना, दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना आणि आता तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. कोरोनामुक्त भारत करण्यासाठी या लसीकरण मोहिमेत पात्र ठरणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन आमदार जगताप यांनी यावेळी केले.