शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे मागील काही दिवसापासून शासनाने कडक निर्बंध घातले आहेत त्यामध्ये जमावबंदी, संचारबंदी असे आदेश नागरिक पाळत आहेत, पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाचे पोलीस नागरिकांनी काटेकोर नियमांचे पालन करावे. याकरिता रात्रंदिवस कष्ट करीत आहेत या वाहतूक पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष अतिश आनंदराव बारणे व साक्षम सोशल फाउंडेशन वतीने वाहतूक पोलिसांना सॅनिटायझर सर्व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अतिश बारणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की
“गेल्या वर्षभरापासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासन दिवसरात्र कष्ट करीत आहेत. स्वतःच्या आरोग्याची पर्वा ना करता फक्त नागरीकांच्या सुरक्षितेसाठी रस्त्यावर सेवा देत असतात. पिंपरी चिंचवड परिसरातील अशा वाहतूक पोलिसांच्या आरोग्यासाठी व या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्या साठी सॅनिटायझर व मास्क सक्षम सोशल फांऊडेशन माध्यमातुन वाटप करण्यात आले,
राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे आपल्या समाज कार्यतून एक सक्षम युवा नेता म्हणून नावारुपास आले आहेत तसेच ते आपल्या सक्षम सोशल फाउंडेशन च्या माध्यमातूनही अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात.