शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी युवासेने तर्फे कोरोना व लॉक डाऊन परस्थितीमध्ये उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तींचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
संजय गायखे ( सामाजिक कार्यकर्ते ), अतुल दौंडकर, ( सामाजिक कार्यकर्ते ) दिनेश तावरे (परिमंडळ अधिकारी अन्नधान्य वितरण विभाग),राजू बनसोडे (नगरसेवक ),जयश्री कवडे ( मंडलाधिकारी ), शंकर अवताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक ),महेंद्र गाढवे ( पी.स. आय ),डॉ. विजया आंबेडकर ( ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी ),सुनील चव्हाण ( आरोग्य निरीक्षक ),कैलास पुरी (पत्रकार ),संदेश पुजारी (पत्रकार )मिलिंद कांबळे (पत्रकार ),संगीता पाचंगे (पत्रकार ),ऍड. विनोद यादव, ऍड. अजित बोऱ्हाडे,ह्यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी अविनाश जाधव, बुद्धीसागर गायकवाड, चिंचप्पा निन्गडोळे, महादेव गायकवाड, मनोज काची, प्रमोद गायकवाड, मोसीन शेख, शंकर शेंडगे, अक्षय हाडके उपस्थित होते. कार्यक्रम चे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.