शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी वाल्हेकरवाडी ते रावेत कडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करून विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली त्यांच्याकडून एक ट्रक तसेच २७ हजारांची वाळू असा तीन लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
ऋषिकेश अनिल चव्हाण व राजू परमेश्वर खोत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांचे सह रोहित कराळे याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू चोरी करून विनापरवाना चोरटी वाहतूक करून आरोपी हे वाळूची विक्री करणार असल्याचे समोर आले. सदरची कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाचे उपनिरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे आणि त्यांच्या पथकाने केली
Advertisement