शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आज नवीन कोरोना बाधित १५१७ रुग्ण आढळून आले आहेत पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत एक लाख ७३ हजार ३१९ इतके कोरोना बाधित रुग्ण संख्या झाली असून आज्ज आज डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या ३,३५२ आहे तर एकूण करोना मुक्त १,४८,६२८ आहेत आज दिवसभरात ४५ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.कोरोना मुळे एकूण मयत ३,१६३ झाले आहेत.
प्रशासन वतीने अनेक निर्बंध घालण्यात आले असल्याने आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसांपासून कमी होत आहे परंतु मृतांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड करांची चिंता कमी झालेली नाही, मृत्युदर कमी झाल्यावरच पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळणार आहे.
Advertisement