पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील स्वाभिमानी विकास मंच या संस्थेच्या वतीने घरकुल चिखली येते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करा असे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत स्वाभिमान विकास मंचच्या वतीने साध्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष शिवदास चिलवंत , बबन चव्हाण प्रविण कदम अमोल केंद्रे केतन कोळगे संदेश कोळगे अलका चिलवंत वर्षा पाटील सिमा जोशी संगीता तांदळेकर तानाजी क्षीरसागर प्रकाश तांदळेकर मंगल वाघमारे कुंदा गायकवाड अनिता दरकसे साईनाथ थिटमे सुरेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते