शबनम न्युज / पिंपरी-चिंचवड -देहू
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती काल मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चव्हाण नगर देहू येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने प्रज्ञा बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Advertisement
यावेळी अनेक नागरिकांनी आपले रक्तदान केले. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर सदर चे रक्तदान शिबिर अति महत्त्वाचे असल्याने अनेक नागरिकांनी आपले रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मावळ तालुका चे उपाध्यक्ष निखिल चव्हाण यांनी सदर रक्तदान शिबिराचे नियोजन केले.
Advertisement