शबनम न्युज / पिंपरी
रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्या अधिकारात खरेदी करून कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ उपलब्ध करून द्यावे.अश्या मागणीचे निवेदन माजी विरोध पक्ष नेते व विद्यमान नगरसेवक नाना काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले.
नाना काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे कि राज्यात व शहरात रेमडिसेवर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असुन मा. जिल्हाधिकारी आदेशानुसार शहरातील सरकारी व खासगी रुग्णालय व कोविड केअर केंद्रात ॲडमीट असलेल्या सर्व रुग्णांना त्यांच्या आजाराच्या गरजेनुसार रेमडेसिव्हीर इंजेक्शन रुग्णालयांनीच स्वतःच्या जबाबदारीवर उपलब्ध करून द्यावे. तरीपण बहुतेक रूग्णालय रेमडेसिव्हीर इंजेक्शन रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून आणण्यासाठी तेथील डॉक्टर चिट्ठी लिहून देत आहेत असे करणार्या रूग्णालयांवर कारवाई करण्यात यावी तसेच, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे ज्यांच्याकडे हे इंजेक्शन उपलब्ध आहे ते याचा काळाबाजार करून नागरिकांना दाम दुप्पट तिप्पट करून विकत आहेत. त्यामुळे रुग्णांचे व त्याच्या नातेवाईकाचे हाल होत आहेत. तरी याची गंभीर दखल घेवुन मा. जिल्हाधिकारी आदेशानुसार रुग्णालयांनीच रेमडेसिव्हीर इंजेक्शन कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध करून द्यावे. आयुक्त महोदय यांनी आपल्या अधिकारात शहरामधील गरजू नागरिकांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा व शहरातील नागरिकांना उपल्बध करून द्यावे व शहरातील होणारे हाल थांबवावेत अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे