शबनम न्युज / बारामती
गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी, अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिविर,ऑक्सिजनसाठी रूग्ण व नातेवाईकांची कोंडी करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर आता तपासणी पथकाची करडी नजर राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठकीत ते बोलत होते.
सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसेच निधीचीही कमरतरता पडू दिली जाणार नाही. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, ऑक्सिजन वापराबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक वापर करावा, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.