शबनम न्यूज / देहू
देहू – कोणताही स्वार्थ न पाहता समाजासाठी झोकून दिले.प्रत्येक जण माझाच आहे,या विचारातून मिळालेली ऊर्जा व त्यातून केलेले काम,यातून मी जनतेवर पकड निर्माण केली.असे प्रतिपादन अमित घेनंद यांनी बाकडे लोकार्पण सोहळा संपन्न करताना केले.
देहू गावातील प्रभाग ४ मधील प्रमुख मानल्या जाणाऱ्या निसर्ग सोसायटी, विघ्नहर्ता सोसायटी या भागातील अनेक सभासदांची मागणी होती कि आमच्या सोसायटी मध्ये महिला आणि जेष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी बाकडे पाहिजे हि विनंती मान्य केली आणि आज या दोन्ही ठिकाणी मावळ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बाकडे बसविले…तेथील सर्व महिला आणि जेष्ठ नागरिक यांनी समाधान व्यक्त केले. तुमचे कोणतेही सार्वजनिक अथवा वैयक्तिक काम असुध्या अगदी निःसंकोचपणे माझ्याकडे या मला तुमचा हक्काचा लहान भाऊ म्हणून सांगा ते काम पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करील. कारण मला फक्त तुमची सेवा करायची आहे. मला तुम्हाला काम करून दाखवायचे आहे. म्हणून मला संधी द्या.युवक सहकारी मित्रांनी पण भविष्य काळात देखील निश्चितपणे आम्ही सर्व तुमच्या पाठीशी एकमताने उभे राहू अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष दिपक जाधव,नागनाथ माळी,नाना काळे,मंगेश जाधव,बाळू टकेकर,अभिजित अजगेकर,नितीन शेलार,रोहित राऊत,मनोज हिरवे,नारायण माळी, हाके साहेब,सोनू पेठेकर,अर्जुन पटेकर,सागर राऊत,दत्ता पाटील व सहकारी उपस्थित होते.