शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर विकास निधीतून चार ॲम्बुलन्स व एक रक्त पेढी (प्लाझ्मा पेढी सह) नागरिकांसाठी देण्यात येणार असल्याबाबत ची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोना ची दुसरी लाट आलेली असून कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात लॉक डाउन लागू करण्यात आलेला आहे कोरोना च्या या संकटकाळात महापालिका हद्दीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या वतीने विविध बचावात्मक व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे covid-19 ग्रस्त तसेच इतर गंभीर रुग्णांना देखील रुग्णालयांमध्ये हलविणे सोयीचे व्हावे याकरिता महापौर विकास निधीमधून चार ऍम्ब्युलन्स नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असून त्यापैकी दोन अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज कार्डियाक ऍम्ब्युलन्स असणार आहे तसेच कोरोना च्या रुग्णांसाठी प्लाजमा थेरपी वरदान ठरत असल्याने एक रक्तपेढी (प्लाझ्मा पेढी सह) महापौर विकास निधीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले