पुणे, : ‘कोरोना’ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना ‘कोरोना’ संकटाशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाचशे पीपीई कीटचे मोफत वाटप ‘पार्थ पवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून पुण्यातील ससूनच्या रुग्णालयाला करण्यात आले. युवा नेते पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोरोना’ काळात ‘पार्थ पवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख शहरांसह अनेक भागात ‘कोरोना’चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य शासनाच्यावतीने ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या ‘कोरोना’च्या लढ्यात अनेक सामाजिक संस्था आपल्या परीने योगदान देत आहेत. युवा नेते पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम राबवून ‘कोरोना’ लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात मोफत फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. तसेच याच उपक्रमांतर्गत पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील ससून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर स्टाफसाठी पाचशे पीपीई कीट मोफत देण्यात आले आहेत. ‘पार्थ पवार फाऊंडेशन’च्या या मदतीबद्दल ससून रुग्णालयाच्यावतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी पार्थ पवार फाऊंडेशनचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगावचे नगरसेवक संतोष भेगडे आणि पार्थ पवार फाऊंडेशनचे सिनिअर ऑपरेशन मॅनेजर नचिकेत खरात उपस्थित होते.