शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे हा संक्रमण रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर अनेक प्रयत्न होत आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशान्वये समन्वय अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटर करिता बाळासाहेब खांडेकर सहाय्यक आयुक्त यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच त्यांच्यासोबत सुनील अलमलेकर व प्रशांत जोशी यांचीदेखील समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीन अधिकाऱ्यांनी तीन शिफ्टमध्ये जम्बो कोविड सेंटर येथील समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करावे असे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.