शबनम न्यूज / पुणे
पुणे महानगरपालिकेतील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केवळ पाच दिवसात पुण्यात 40 ऑक्सिजन बेड आणि 40 होम आयसोलेशन बेड उभारल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत याबाबतची त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट द्वारे माहिती देताना सांगितले की पाच दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटल च्या मदतीने एका हॉटेलच्या हॉल मध्ये 40 बेड ऑक्सिजन आणि 40 होम आयसोलेशन बेड हॉस्पिटल सुरू करू शकतो तर मग पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त दहा बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात 1680 बेड तयार झाले असते आणि आपण पुणेकरांना या कोरोना विषाणू पासून वाचवू शकलो असतो असे त्यांनी सांगितले.
५ दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो तर मग पुणे महानगरपालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात १६८० बेड तयार झाले असते.
(१/२)#पुणे #Pune pic.twitter.com/igDGeero7E— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 16, 2021