पुणे, दि. 17 : पुणे विभागातील 8 लाख 19 हजार 202 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 68 हजार 466 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 30 हजार 148 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 116 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.97 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.59 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 96 हजार 933 रुग्णांपैकी 5 लाख 86 हजार 459 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 99 हजार 354 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.60 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.15 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 79 हजार 107 रुग्णांपैकी 65 हजार 581 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 527 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 76 हजार 988 रुग्णांपैकी 64 हजार 659 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 92 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 237 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 59 हजार 303 रुग्णांपैकी 51 हजार 374 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 25 आहेत. कोरोनाबाधित एकूण1 हजार 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 135 रुग्णांपैकी 51 हजार 129 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 150 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 193 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 10 हजार 963, सातारा जिल्ह्यात 1 हजार 395 , सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 500, सांगली जिल्ह्यात 883 तर कोल्हापूर जिल्ह्यात 452 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 555 आहे. पुणे जिल्हयामध्ये 10 हजार 282 , सातारा जिल्हयामध्ये 482, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 201, सांगली जिल्हयामध्ये 371 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 219 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 57 लाख 90 हजार 654 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 9 लाख 68 हजार 466 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 16 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)