शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे
निरामय हॉस्पिटल हे कोरोना सदृश्य रुग्ण रूग्णालय
पिंपरी चिंचवड शहर मध्ये मध्ये वाढता कोरोना चा प्रादूर्भाव पाहता काही व्यक्तींना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवतात परंतु कोरोना ची टेस्ट होईपर्यंत सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे निश्चित होत नाही तोपर्यंत या व्यक्तीस उपचार मिळण्यास अडचण येत आहे त्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल हे कोरोना सदृश्य रुग्ण रूग्णालय म्हणून घोषित केले आहे ज्यामध्ये असे रुग्ण जाऊन उपचार करून घेऊ शकतील ज्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार पद्धती निश्चित करण्यात येईल.
यापुढे खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना मनपाच्या अतिदक्षता विभागामध्ये भरती न करून घेण्याचा निर्णय
पिंपरी-चिंचवड मनपातील कोविड हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण आयसीयूमध्ये आहेत काही कारणास्तव सदरचे रुग्ण मनपाच्या आयसीयू मध्ये स्थलांतरित करतात त्यामुळे मनपाच्या अतिदक्षता विभाग वर ताण येत आहे तसेच सदर चा रुग्ण अत्यंत क्रिटिकल कंडिशन मध्ये असल्याने तो दगावल्यास मनपा ला सदर बाबत स्पष्टीकरण द्यावे लागतात तरी सद्यस्थितीमध्ये मनपाच्या अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा जागा शिल्लक नाही व जे रुग्ण मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाखल आहेत त्यांना अतिदक्षता विभागामध्ये घ्यावे लागते त्याची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळे यापुढे खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना मनपाच्या अतिदक्षता विभागामध्ये भरती न करून घेण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
बालेवाडी येथील कोविड केअर सेंटर येथे 150 बेडची व्यवस्था
महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये वायसीएम जम्बो कोविड सेंटर, ऑटॉक्लस्टर सेंटर इत्यादी या ठिकाणी रुग्ण बरे होत आलेले असताना परंतु त्यांना विलगीकरणाची आवश्यकता असते अशा रुग्णांना टप्प्याटप्प्याने सामान्य परिस्थितीमध्ये आणावे लागते अशा रुग्णांसाठी बालेवाडी येथील कोविड केअर सेंटर येथे 150 बेडची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे त्या ठिकाणी डाऊन रुग्णांना ठेवण्यात येईल अशा प्रकारची व्यवस्था मनपा मार्फत करण्यात येत आहे.
कोविड रुग्णालयांनी बेड संख्या मानपास कळवावी अन्यथा कारवाई
पिंपरी चिंचवड मनपा मध्ये १०१ हुन अधिक कोविड रुग्णालय म्हणून मनपाने मान्यता देण्यात आलेली आहे सदर रुग्णालयांनी त्यांच्याकडील बेडची संख्या मनपास कळविणे आवश्यक आहे काही ठिकाणी त्याबाबत मनपा सहकार्य केले जात नाही असे निदर्शनास आलेले आहे त्यासाठी अशा सर्व रुग्णालयांना मनपा आयुक्त यांच्या स्वाक्षरीने लेखी सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत यापुढे असा रुग्णालयांनी मनपास सहकार्य न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे