लव्ह लग्न लोचा, कालाय तस्मै नमः, वीर शिवाजी यासारख्या टीव्ही मालिका भूताचा हनीमून, वात्सल्य, आणि माणूस एक माती अश्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या रुचिता
3 मे रोजी पाचगणी येथील खासगी फार्महाऊसमध्ये मुंबईतील उद्योगपती आनंद माने शी विवाहबद्ध होत आहे.
आनंद माने बद्दल बोलताना रुचिता सांगते, “आमच अरेंज मॅरेज आहे. लॉकडाउन लागू होण्यापूर्वी आम्ही मागील वर्षी भेटलो होतो. आम्ही आपल्या आयुष्याबद्दल बोललो आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले”
त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे, आम्हाला भेटता आहे नाही महिने गेले परंतु ते संपर्कात राहिले. जर मी कधीकधी मेसेज नाही केला तरी आनंदने माझ्याशी नियमितपणे बोलणे सुरु ठेवले जेव्हा शूट पुन्हा सुरु झाले तेव्हा मी त्याला पुन्हा भेटायला लागले त्यानंतर, डिसेंबर 2020 मध्ये आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमची कुटुंबानी आम्हाला एकमेकांना ओळखण्यासाठी पुरेसा वेळ दिला आणि यामुळे लग्नचा निर्णय घेतला.
आनंद यांनी गेल्या आठवड्यात रुचिताला अधिकृतपणे मागणी घातली. तीन दिवस हा विवाह सोहळा कार्यक्रम,1 व 2मे ला….मेहेंदी, हळद,संगीत आणि 3मे ला लग्न असा असल्याचे रुचिताने सांगितले. तिच्या आईने स्वतःच्या लग्नात साडी घातलेली होती तीच साडी आपल्या लग्नात घालून आपले आई बद्दल प्रेम व्यक्त करणार आहे
. ती पुढे म्हणाली, “निर्बंध हटवल्यानंतर आणि सर्व वातावरण चांगले झाल्यावर,आम्ही आमच्या सर्व मित्रांसाठी तसेच इंडस्ट्रीतील सहकारी यांसाठी पार्टी आयोजित करू”