शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडा वाढतच आहे आज दिवसभरात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत 2982 रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे 54 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात 1 लाख 80 हजार 916 कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली असून, आज एकूण 2756 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 1 लाख 56 हजार 366 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होईना. महाराष्ट्र शासनाने एक मे पर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. परंतु नागरिक हे निर्बंध पाळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनारुग्णांचा आकडा हा कमी होत नाहीये. नागरिकांनी प्रशासनाचे दिलेले नियम काटेकोरपणे पालन केले, तर निश्चितच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत व सहकार्य होणार आहे.