विभागात कोरोना बाधित 9 लाख 85 हजार 657 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव
शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 8 लाख 32 हजार 767 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 85 हजार 657 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 33 हजार 605 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 285 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.96 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 9 हजार 769 रुग्णांपैकी 5 लाख 98 हजार 182 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 367 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.58 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.28 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 80 हजार 520 रुग्णांपैकी 66 हजार 242 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 269 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 78 हजार 377 रुग्णांपैकी 65 हजार 201 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 906 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 265 रुग्णांपैकी 51 हजार 737 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 610 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 726 रुग्णांपैकी 51 हजार 405 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 453 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 191 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 12 हजार 836, सातारा जिल्ह्यात 1 हजार 413, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 389 , सांगली जिल्ह्यात 962 तर कोल्हापूर जिल्ह्यात 591 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 565 आहे. पुणे जिल्हयामध्ये 11 हजार 723, सातारा जिल्हयामध्ये 661, सोलापूर जिल्हयामध्ये 542, सांगली जिल्हयामध्ये 363 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 276 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 58 लाख 66 हजार 203 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 9 लाख 85 हजार 657 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.