शबनम न्यूज / पिंपरी
महाराष्ट्र राज्यातील कोविड-१९ रुग्ण व संसर्ग नियंत्रणकामी वय वर्षे २५ पेक्षा अधिक असणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे अशी मागणी चे निवेदन पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी चे नगर सेवक संजय वाबळे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले आहे निवेदनात त्यांनी नमूद केले आहे आपल्या राज्यातील वाढती कोविड-१९ रुग्ण व संसर्ग प्रमाण यावर नियंत्रणकामी सद्यस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वय वर्षे ४५ पेक्षा अधिक असणाऱ्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील वयोगट २५ ते ४४ असणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग प्रमाण तीव्रपणे वाढल्याचे चित्र दिसत आहे तरी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी सदरच्या लसीकरण मोहिमेमध्ये वयोगट २५ ते ४४ असणाऱ्या नागरिकांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा याबाबतचे निर्देश आपल्या स्तराववरून निर्गमित करण्यात यावेत.