पुणे, दि. 19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 38 हजार 818 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 463 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.94 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.21 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 22 हजार 476 रुग्णांपैकी 6 लाख 7 हजार 597 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 3 हजार 543 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.10 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 81 हजार 954 रुग्णांपैकी 66 हजार 664 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 272 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 79 हजार 856 रुग्णांपैकी 66 हजार 492 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 70 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 95 रुग्णांपैकी 52 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 53 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 320 रुग्णांपैकी 51 हजार 557 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 880 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 44 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 12 हजार 707, सातारा जिल्ह्यात 1 हजार 434, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 479 , सांगली जिल्ह्यात 830 तर कोल्हापूर जिल्ह्यात 594 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 653 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 415, सातारा जिल्हयामध्ये 422, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 291, सांगली जिल्हयामध्ये 373 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 152 रुग्णांचा समावेश आहे.