शबनम न्युज / भोसरी
भोसरीतील नागरीकांसाठी गवळी नगर प्रभागात संत निरंकारी भवन ,भोसरी शाखा येथे अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त नविन कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे मागणीचे निवेदन नगरसेविका प्रियांका बारसे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दुर्दैवाने गवळीनगर प्रभागात एकही सरकारी दवाखाना कींवा हॉस्पिटल उपलब्ध नाही.
आपल्या पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शहरातील रुग्णांना उपचारासाठी असलेले महानगरपालिकेचे सर्व दवाखान्यांमध्ये तसेच खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नाही.
ही बाब लक्षात घेऊन गवळीनगर प्रभागातील संत निरंकारी भवन,भोसरी शाखेचे सर्वेसर्वा अंगद जाधवसाहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर याठिकाणी लसिकरण केंद्र तसेच कोविड केअर सेंटर सुरू करण्यास काही हरकत नाही असे त्यांचे लेखी पत्र त्यांनी आपणाला दिलेले आहे.
त्या दृष्टिकोनातून आपण स्वतः या ठिकाणी व्हिजिट देऊन पाहणी करावी असे नगरसेविका बारसे यांनी आयुक्त साहेबांना सुचविलेले आहे
संत निरंकारी मंडळ हे संपूर्ण भारत देशामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असून त्यांची कोणत्याही चांगल्या कामासाठी नेहमीच मदत होत असते .
महापालिकेमार्फत सुविधा देणाऱ्या वैद्यकीय संस्थेमार्फत या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करणे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे तरी आयुक्त साहेबांनी शहरातील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी गवळीनगर प्रभागात भोसरी परिसरातील नागरिकांसाठी संत निरंकारी मंडळ भवन या ठिकाणी उत्तम वैद्यकीय सेवा तसेच नागरिकांच्या सोयीच्या व गरजेच्या दृष्टीने कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी विनंती नगरसेविका प्रियांका बारसे यांनी केलेली आहे.