पुणे :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस )चे सचिव डॉ लतीफ मगदूम(वय ७१) यांचे सोमवारी रात्री निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,२ बहिणी,१ मुलगा,३ नातवंडे असा परिवार आहे.बारा इमाम कब्रस्थान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला.महाविद्यालयीन काळात युवक काँग्रेसच्या चळवळीत असलेले लतीफ मगदूम हे हिराबाग गणेश मंडळ,समाजवादी अद्यापक सभा,मुस्लिम राष्ट्रीय मंच अशा अनेक संस्था-संघटनांशी संबंधित होते.
केंद्र सरकारच्या शिक्षणविषयक समित्यावरही त्यांनी काम केले.‘मी एक कोणीतरी’ या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन इंद्रेशकुमार यांच्या हस्ते झाले होते.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सहसचिव प्रा इरफान शेख आणि मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले .