लसीकरणाची सुरूवात विद्यापीठात व महाविद्यालयातून करण्यात यावी.
शबनम न्युज / पुणे
18 वर्षावरील तरुणांना लसीकरण हे विनामूल्य करण्यात यावं अशी मागणी शर्मिला येवले ( विद्यार्थिनी फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे.) यांनी केली आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे व शिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या पत्रात शर्मिलायेवले यांनी नमूद केले आहे कि सध्याच्या परिस्थितीत कोरोना पेशंट हे तरूण वयातील युवक जास्त आहे.त्यामुळे सध्या पालक व विद्यार्थी हे चिंतते आहे.येणा-या काळात होणा-या परिस्थितीचा अंदाज घेत मुलांच्या परीक्षा आणि कोरोना यांची भिती जर विद्यार्थ्यांच्या मनातून कमी करायची असेल तर प्रथम प्राधान्याने विद्यापीठ व महाविद्यालयात लसीकरण करण्यात यावं.त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ही विचार करण्यात यावा त्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या विद्यापीठ व महाविद्यालयाने योग्य नियोजन करणं अपेक्षित आहे. त्यासाठी अवश्य नाव नोंदणी करून 1 मे पासून रोज एका वर्गातील 50-100 अशा स्वरूपात लसीकरण करण्यात यावे व ते विनामूल्य असावे अशी आमची मागणी आहे कारण विद्यार्थ्यांकडे पैसे नसता आणि कमवा व शिका योजना ही बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची आधीच अर्थिक चणचण आहे. तसेच पुर्णपणे लसीकरण झाल्यानंतर ऑफलाईन परीक्षा विचार सरकार व प्रशासनाने करावा.