शबनम न्युज / पिंपरी
दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरु करावे अशी मागणी कुशाग्र कदम यांनी केली आहे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून शहरातील रुग्णांना उपचारासाठी असलेले आपल्या महापालिकेचे वाय.सी.एम. , जिजामाता , भोसरीचे कोविड हॉस्पिटल, जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कॉविड सेंटर, तसेच खाजगी रुग्णांलयामध्येही जागा मिळत नाही. मनपाने कोरोना लसीकरण मोहिम चालू केली आहे. त्यासाठी मनपाच्या सर्व रुग्णालयात, खाजगी रुग्णांलयांमध्ये तसेच स्वतंत्र लसीकरण केंद्रे चालू केली आहेत, त्याला नागरीक उत्तम प्रतिसाद देत आहेत. परंतु शहरातील दिव्यांग नागरीकांना या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे त्रासाचे व गैरसोयीचे होत आहे. त्यांना रांगेत जास्त काळ थांबणे शक्य होत नाही. पिंपरी चिंचवड शहरात सुमारे दहा हजार दिव्यांग आहेत या दिव्यांग नागरीकांना स्वतंत्र लसीकरण केंद्र चालू केल्यास त्यांना सोयीचे व त्रासाचे होणार नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र त्वरीत चालू करण्यात यावे. म्हणजे दिव्यांग नागरीकांची गैरसोय होणार नाही व जास्तीत जास्त दिव्यांग नागरीकांचे लसीकरण होईल. असे कुशाग्र कदम यांनी म्हंटले आहे