पुणे, दि. 20 : पुणे विभागातील 8 लाख 57 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 16 हजार 64 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 39 हजार 61 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 673 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.94 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.38 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 32 हजार 58 रुग्णांपैकी 6 लाख 18 हजार 163 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 2 हजार 452 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.44 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 83 हजार 167 रुग्णांपैकी 67 हजार 30 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 108 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 81 हजार 1 रुग्णांपैकी 67 हजार 827 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 840 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 62 हजार 87 रुग्णांपैकी 52 हजार 510 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 627 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 751 रुग्णांपैकी 51 हजार 800 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 34 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 917 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 13 हजार 363 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 582, सातारा जिल्ह्यात 1 हजार 213, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 145 , सांगली जिल्ह्यात 992 तर कोल्हापूर जिल्ह्यात 431 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 910 आहे. पुणे जिल्हयामध्ये 10 हजार 566, सातारा जिल्हयामध्ये 366, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 335, सांगली जिल्हयामध्ये 400 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 243 रुग्णांचा समावेश आहे.