शबनम न्युज / मुंबई
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान कोरोना च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला ,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली, गुणांमध्ये समानीकरण यावे यासाठी इतर मंडळा प्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाचे आधारावर गुण देण्यात येणार आहे तसेच श्रेणीसुधार हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी किंवा कशी द्यायची याबाबत ही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
तसेच बारावी परीक्षा होणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे या बैठकीत लॉक डाऊन ,कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि परीक्षा बाबत ही चर्चा करण्यात आली कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Given the worsening situation of the #Covid-19 pandemic, the Maharashtra government has now decided to CANCEL the state board exams for class 10th. The health & safety of our students and teachers is our topmost priority.#exams #ssc #hsc pic.twitter.com/C8xCY3VVdX
Advertisement— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 20, 2021