शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील निगडीतील ओटा स्कीम परिसरात मंगळवारी दुपारी एका तरुणावर खुनी हल्ला करून जखमी करण्यात आले आकाश उर्फ मोन्या कांबळे या तरुणाचा सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास खून झाला या खुनाचा बदला घेण्यासाठी मंगळवारी दुपारी आठ जणांनी शक्तिमान प्रकाश कांबळे याच्यावर हा हल्ला केला भरदिवसा भररस्त्यात आठ जणांनी शक्तिमान याला सिमेंटचा गट्टू आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली यात शक्तिमान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत खुनी हल्ला केल्याप्रकरणी भरत दिलीप लोंढे यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सोहेल जाधव, हेमंत खंडागळे, गणेश धोत्रे, यश खंडागळे, वैभव वावरे, श्रवण कुराडे, व आणखी दोन या आठ जणांच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत
Advertisement