शबनम न्यूज / मुंबई
नाशिक मधील ऑक्सीजन गळतीच्या दुर्घटने वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे एकीकडे महाराष्ट्र हा कोरोना विषाणू शी लढत असताना कोरोना च्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे अशातच नाशिक महानगर पालिका रुग्णालयातील ऑक्सीजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
नाशिकच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ जणांना प्राण गमवावे लागले हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही, एकाएक कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्त करीत असताना असा अपघात आघात करतो, राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे ,मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू, त्यांचे अश्रु कसे पुसू ,आपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे, या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेत जो जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही पण या दुर्दैवी घटनेचे राजकारण ही कोणी करू नये, संपूर्ण महाराष्ट्र साठी हा आघात आहे, नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोक मग्न आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले असून मृताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची देखील त्यांनी जाहीर केले आहे
महाराष्ट्र शोकमग्न आहे!
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/l4cBfMOxEO— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021