शबनम न्यूज / पिंपरी
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले असून हि घटना अत्यंत दुखदायक असून अशा प्रकारची घटना पुन्हा कुठेच होऊ नये यासाठी आपणदेखील या घटनेची गंभीरपणे दाखल घेऊन योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी. असे राष्ट्रवादी चे नगरसेवक संजय वाबळे यांनी मनपा आयुक्त याना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे
पिंपरी चिंचवड शहरातील कोविड19 चे वाढते प्रमाण व ऑक्सिजनचा तुटवडा होत असतांना आपल्या कार्यक्षेत्रातील मनपाचे व खाजगी कोविड रुग्णालय तसेच जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होता कामा नये तसेच याठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन टाक्यांची व पुरवठा नलिका याची नियमितपणे तपासणी व दुरुस्ती करावी याबाबतचे तातडीने निर्देश आपण संबंधित सर्व रुग्णालय व्यवस्थापनाला द्यावेत.असे हि नगरसेवक संजय वाबळे यांनी म्हंटले आहे