शबनम न्यूज / अहमदनगर
अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती करीम हुंडेकरी यांचे अपहरण प्रकरणी असलेला मुख्य आरोपी अझर शेख आणि निहाल शेख यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली पोलिसांनी अपहरणकर्ते ची माहिती काढून अपहरण झाल्यानंतर काही तासातच उद्योगपती करिम हंडेकरी यांची सुखरूप सुटका केली होती.
या प्रकरणानंतर आरोपी अझर शेख हा फरार झाला होता त्याला पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली होती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अझर मंजूर शेख व निहाल शेख यांना दोषी धरुन जन्मठेप तसेच दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली.
शहरातील कोठला परिसरातून करीम हुंडेकरी यांचे अपहरण झाले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा पोलिसांनी हुंडेकरी यांची काही तासांमध्ये सुखरूप सुटका केली होती. यानंतर आरोपी अजहर शेख व निहाल शेख यांना पोलिसांनी अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन अप्पर अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी करून न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात अॅड. ए. बी. पवार यांनी सरकारी पक्षाची बाजी मांडली.