शबनम न्युज / मावळ
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर फ्लेक्स, जाहिरात, जाहिर समारंभ टाळून मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
संतोष भेगडे यांच्या वतीने येळसे प्राथमिक आरोग्य केंद्र, पवनानगर प्राथमिक आरोग्य केंद्र, पवनानागर पोलीस मदत केंद्र, तसेच पवनानगर बाजारपेठेत दुकानदारांना, भाजीपाला विक्रेते व हमाल यांना सुमारे २००० N-95 मास्क चे वाटप करण्यात आले.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. यावेळी कोरोनाला अटकाव करण्यासाठी व या महाभयानक विषाणूपासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांतदादा दहिभाते, मा. चेअरमन नामदेव ठुले, मा. सरपंच लालाजी गोणते, मावळ तालुका राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष पांडुरंग शिर्के, सरचिटणीस संजय मोहोळ, रोहिदास घोजगे, व्यापारी सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब छाजेड, बोहरा शेठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, चंद्रकांत दादा युवामंच चे कार्यकर्ते व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे मित्र परिवार उपस्थित होता.
मागील वर्षी प्रमाणे सलग दुसऱ्या वर्षीही मोठा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवस साजरा न करता सामाजिक भान राखून तया पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन केले होते व या उपक्रमाचे अनुकरण इतरांनी करावे असे आवाहन संतोष भेगडे यांनी केले. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा वापर करावा. आपल्यापासून इतरांना धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. मागील १४ महिन्यांपासून आपले तळेगाव शहर व मावळ तालुक्यात वाढलेला कोरोना व त्या पार्श्वभूमीवर झालेली कामगारांची पिळवणूक लक्षात घेऊन हातावर पोट भरणाऱ्या तसेच आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या नागरिकांसाठी नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने मोफत अन्नदान, अन्नधान्याचे वाटप, मास्क वाटप, आरोग्य तपासणी, औषध वाटप, आरोग्य किट वाटप असे अनेक उपक्रम राबवले गेले.त्याचा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.
आजही कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम हाती घेतली असून त्याद्वारे अनेकांना लाभ मिळत आहे.वाढदिवसाचे निमित्त साधून नगरसेवक संतोष भेगडे यांनी ५००० नागरिकांना लसीकरण करून देण्याचा संकल्प केला आहे.