शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी देशातला पहिला कोरोना रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात आढळला. तेव्हापासून महापालिका प्रशासन, डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, शहरातील खासगी रुग्णालये, सफाई कर्मचारी अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा जोखीम पत्करून कोरोना संकटाशी लढत आहे. मात्र, दुर्लक्षामुळे किंवा तांत्रिक दोषामुळे केवढी मोठी जीवितहानी होऊ शकते, हे नाशिकमधील दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने रुग्णांना सुरू असलेला प्राणवायू अचानक थांबला आणि २४ रुग्णांना प्राण गमवावा लागला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या पार्शवभूमीवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा सुरक्षित व सुरळीत करण्यात यावी असे निवेदन विद्यमान नगरसेवक वसंत बोराटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे
निवेदनात नमूद केले आहे कि आज पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका रुग्णालये, कोविड सेंटर्स, खासगी रुग्णालयांमध्ये असंख्य कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आधीच संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार आणि कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अशा कठीण परिस्थितीत रुग्णालयातील काही तांत्रिक बिघाडामुळे अडचणीत भर पडणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
नाशिकमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व महापालिका व खासगी रुग्णालयातील सर्व यंत्रणा तपासून घेणे गरजेचे आहे. रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या सर्व मशिनरी, वीज कनेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, औषधांची उपलब्धता व वैधता याची रोज पाहणी करणे महत्त्वाचे आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कुठे तांत्रिक दोष असेल तर त्वरित दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. कोरोना संकटात एक दूकही महागात पडू शकते.
याबद्दल आपण शहरातील सर्व रुग्णालयांच्या प्रशासन विभागाला आपली आरोग्य यंत्रणा सुरक्षित व सुरळीत करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात,