शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
कोरोना सारख्या संकटमय काळामध्ये अति उत्तम कामगिरी बजावणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कसा असावा तर उद्धव ठाकरे यांच्यासारखा असावा हे आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन सौ पौर्णिमा अगरवाल यांनी शिवसेनेमध्ये जाहीर रीत्या प्रवेश केला शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका, माजी नगरसेविका सुलभाताई उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया पार पडली
सौ.आगरवाल या महिला बचत गटाचा माध्यमातुन अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत.तसेच त्या महिलांना उद्योगांमध्ये येण्याकरिता स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स व ब्युटी पार्लरचे कोर्सचे मोफत प्राशिक्षण देत आहेत.या कोर्सच्या माध्यमातुन अनेक महिलांना रोजगार व नोक-या त्यांनी मिळवुन दिल्यात.त्याच्याबरोबर शिवसेनेत सौ.रेशमा मनवार,सौ.अपर्णा गफने,सौ.शारदा धनशेट्टी,सौ.सविता माने,सौ.वर्षा वाघमारे,सौ.किर्ती गायकवाड यांनी हि जाहीर प्रवेश केला.