पिंपरी (दि. 23 एप्रिल 2021) कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीत पिंपरी चिंचवड शहरात सकारात्मक रुग्णांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. आजपर्यंत 1,93,512 रुग्ण बाधित झाले आहेत. गुरुवारी 2539 रुग्ण बाधित झाले आहेत. विविध रुग्णालयात दाखल रुग्णांना रक्ताची व प्लाझ्माची गरज भासत आहे. वाढत्या रुग्ण संख्येला उपलब्ध रक्त बाटल्या आणि प्लाझ्मा कमी पडत आहेत. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्लाझ्मादान करणा-या प्रत्येक व्यक्तीस कै. तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान आणि कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवसेना दिघी विभाग प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी एक हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देणार असल्याचे जाहिर केले आहे. ज्या नागरीकांनी आणि फ्रन्ट लाईनला काम करणा-या कोरोना यौध्दांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मादान करण्याचे आवाहन दिघी शिवसेना विभाग प्रमुख संतोष वाळके यांनी केले आहे. एक प्लाझ्मा दान करणारा व्यक्ती तीन बाधितांचे प्राण वाचवू शकतो. प्लाझ्मा दान केल्यामुळे कोणताही आजार होत नाही. रक्तदान केल्याप्रमाणे प्लाझ्मादान करणे हे जीवनदान दिल्यासारखे आहे. इच्छुक प्लाझ्मादात्यांनी माऊली निवास, विठ्ठल मंदिरा शेजारी, पुणे आळंदी रोड, दिघी, पुणे – 15 येथे 8830401931 किंवा 9604557678 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन संतोष वाळके यांनी केले.