शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी, २३ एप्रिल २०२१ :- महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयासह झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे १५ कोटी ९२ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
प्रभाग क्र. ९ नेहरुनगर खराळवाडी आणि इतर भागांमधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी २
कोटी ९३ लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.६ मधील धावडेवस्ती परिसरातील नाल्यांची सुधारणा करण्यासाठी ४७ लाख ७७ हजार
रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ८ सेक्टर क्र.४ मधील एल.सी.-१ गृहसंस्था शेजारील रस्त्यावर सी. डी. वर्क बांधण्याकामी
४९ लाख ७२ हजार रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १२ तळवडे येथील सीमा भिंत बांधण्याकामी १ कोटी २४ लाख ८९ हजार रुपये इतक्या
खर्चास मान्यता देण्यात आली.