शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी, दि.२३ एप्रिल २०२१ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयांकडुन नागरिकांना योग्य माहिती आणि मदत मिळण्यासाठी तसेच योग्य समन्वय साधण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरु केली आहे याबाबतची माहिती दुरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा यांनी दिली आहे. सध्या कोरोना विषाणुंचा प्रसार आणि प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. महापालिकेने नागरीकांच्या आणि रुग्णांच्या मदतीकरीता विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. कोरोना बाधितांवर उपचार
करण्यासाठी कोविड रुग्णालये सुरु आहेत. या रुग्णालयांकडून नागरिकांना योग्य माहिती दिली जावी तसेच योग्य मदत मिळावी या उद्देशाने महापालिकेने स्वतंत्रपणे हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. त्यामुळे योग्य समन्वय साधला जाऊन सुरळीत दळणवळण होणार आहे. पिंपरी येथील यशवंतराव स्मृती रुग्णालय, आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो
कोविड सेंटर, ऑटोक्लस्टर येथील कोविड सेंटर तसेच प्लाझ्मा व रक्त पुरवठा केंद्राकरीता स्वतंत्रपणे कोविड हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आले आहेत.