पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र
शबनम न्युज / पिंपरी
वसई विरारमधील रुग्णालयाला आग, तसेच नाशिक येथील ऑक्सिजन गळती अशा दुर्घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडू नयेत. याकरिता खबरादारीच्या उपाययोजना म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सरकारी व खासगी कोविड रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन पत्र दिले आहेत. याबाबत संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे की, नाशिक येथील ऑक्सिजन गळती आणि त्यानंतर वसई विरारमध्ये रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली. दोन्ही घटना दुर्दैवी असून ह्रदय पिळवटून टाकणा-या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या सरकारी आणि खासगी अशा सर्वच रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाच्या या संकटाच्या घडीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु, काही त्रृटींकडे दुर्लक्ष होऊन शहरात नाशिक, वसई विरारसारखी दुर्घटना घडणार नाही. याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्या दुर्दैवी घटनेचा प्रत्यय पुन्हा कुठेही येऊ नये, ही माफक अपेक्षा सर्वाची आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून शहरातील सर्व खाजगी, तसेच सरकारी कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट लवकरात लवकर करण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.