शबनम न्यूज
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते या प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे याशिवाय अनिल देशमुख यांच्या घरासह त्यांच्या 10 मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत.
अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांना 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असा आरोप करून परमवीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती यानंतर प्रकरण न्यायालयात गेले अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला या प्रकरणी सीबीआयने 14 एप्रिल ला चौकशीसाठी समन्स बजावले होते या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजेची दोन चालक ,बार मालक, मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांची चौकशी केली आहे.