शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पंतप्रधान आवास योजनेतील नागरिकांचे पैसे लॉकडाऊनचे गांभीर्य घेऊन तात्काळ परत करा अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे निवेदनात नमूद केले आहे कि
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या आशेने गोरगरिबांनी अर्ज केले, घरांच्या सोडतीच्या यादीत नाव न आल्याने अनेकांची निराशा झाली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३६६४ सदनिकांसाठी ४८ हजार नागरिकांनी अर्ज भरले होते त्यावेळी पाच हजार रकमेचा डिमांड डाफ्ट जमा करण्याची अट होती त्यानुसार सर्वांनी परिस्थिती नाजुक असताना देखील घराच्या अपेक्षेने हे पाच हजार रुपये आपल्याकडे भरलेले आहेत.
मात्र आता कोरोनामुळे बिघडलेली आर्थिक गणिते आणि पैशाची चणचण गोरगरिबांना भासत आहे. त्यामध्ये पुन्हा परत कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक लोकांचे बळी जात आहेत. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती पुर्ण ढासळलेली आहे, परिस्थिती खुप हालाकीची झालेली आहे.
आपण महापालिकेच्या वतीने आर्थिक दुर्लब घटकातील मोजक्याच लोकांचा विचार केला आहे, घरेलू कामगार करणाऱ्या फक्त २०% कामगार करणाऱ्याच महिला या नोंदणीकृत आहेत परंतु त्यांचे कित्येक वर्षापासून नुतनीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे उर्वरित ८०% घरेलू कामगारांचं काय ?
यात अंध अपंग, विधवा, निराधार, असंघटित कामगार यांचाही आपण विचार करण्याची गरज आहे, झोपडपट्टीत राहणारे गोरगरीब कामगार यांनाही यात सामावुन घेतले तर खऱ्या अर्थाने मदत सार्थकी लागेल.
तरी आपण सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आवास योजनेचे ५०००/- रुपये युद्धपातळीवर तातडीने द्यावे कारण नागरिकांची परिस्थिती खुप हालकीची आहे, ही मदत वेळेत भेटली तरच त्याचा उपयोग होईल त्यामुळे आपण याचा गांभीर्याने विचार करत ही मदत तातडीने द्यावी अशी मागणी दिनेश यादव यांनी केली आहे.