पुणे, दि. 24 : पुणे विभागातील 9 लाख 10 हजार 811 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 78 हजार 179 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 46 हजार 795 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 20 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.48 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 73 हजार 4 रुग्णांपैकी 6 लाख 59 हजार 875 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 1 हजार 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 927 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.54 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.37 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 89 हजार 992 रुग्णांपैकी 71 हजार 423 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 460 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 87 हजार 98रुग्णांपैकी 72 हजार 200 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 407 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 66 हजार 866 रुग्णांपैकी 54 हजार 319 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 509 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 219 रुग्णांपैकी 52 हजार 994 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 217 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 578 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 810, सातारा जिल्ह्यात 1 हजार 742, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 719, सांगली जिल्ह्यात 1 हजार 309 तर कोल्हापूर जिल्ह्यात 998 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण 14 हजार 4 आहे. पुणे जिल्हयामध्ये 10 हजार 310, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 747, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 119, सांगली जिल्हयामध्ये 550 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 278 रुग्णांचा समावेश आहे.