शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शत्रुघ्न काटे यांनी आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. या निवेदना मार्फत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेत कार्यरत असलेले कोविड योद्धे व त्यांच्या कुटुंबीयांना करिता स्वतंत्र बेड राखीव ठेवण्याबाबत ची मागणी केली.
त्यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांसाठी सुसज्ज वार्ड तयार करण्यात आला असून, तो 23 एप्रिल पासून कार्यरत आहे. या कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये होणाऱ्या संसर्गाची भीती न बाळगता आपले पोलिस दल अहोरात्र काम करीत असल्याने व त्यांना संसर्गाची जास्त शक्यता असल्यामुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश व अन्य सर्व अधिकारी तसेच डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांच्या संकल्पनेतून हा अतिशय स्तुत्य व कौतुकास्पद व अत्यंत गरजेचा उपक्रम सुरू झालेला आहे. जसे पोलीस दल सध्या अहोरात्र संसर्गाची भीती न बाळगता कार्यरत आहे. तसेच आपल्या महानगरपालिकेच्या सेवेत डॉक्टर, परिचारिका व इतर वर्कर देखील आज अहोरात्र संसर्गाची तमा न बाळगता कार्यरत आहे. या कोविड योद्धयांनां तसेच त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग झाला. अगर काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर त्यांना देखील प्राधान्याने व तातडीने उपचार व आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा महानगरपालिकेने तात्काळ देणे आवश्यक आहे.
परंतु आतापर्यंत या कोविड योद्धयांसाठी अशा प्रकारची तात्काळ उपचारासाठी ती तरतूद नाही. तरी शहरातील पोलिस दलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला सुसज्ज वाढ व त्याचे उपाययोजनांच्या धर्तीवर महानगरपालिकेने देखील आपल्या सेवेतील या कोविड योद्धयांसाठी अशा प्रकारची राखीव सुसज्ज वाढ व विनाविलंब वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी तात्काळ तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.