- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
- पिंपरी-चिंचवडमधील आरोग्य संबंधी उपक्रमांचे लोकार्पण
शबनम न्युज / पिंपरी
कोविड-१९ च्या संकटकाळात मानवजातीला मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने पिंपरी-चिंचवडमधील मुकाई चौक, रावेत येथे उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिलटचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये १०० बेड्स असून, १० बाय पॅक, ४ व्हेंटिलेटर, ४० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था आहे. तसेच ३० बेड्स विलगीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यावेळी शहराध्यथ तथा आमदार महेश लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, सहकार आघाडीचे शहराध्यक्ष प्रदीप बेंद्रे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, प्रताप सूर्यवंशी, डॉ. देशमुख, श्रीकांत देसाई आदी उपस्थित होते.
तसेच, प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक संदिप वाघेरे यांच्या वैयक्तिक (नगरसेवक) निधीतून मनपा जिजामाता हॉस्पिटलला ३५ लाख रुपयांचे वैद्यकिय साहित्य व ५० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिले. त्यांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. भोंडवे चौक येथे उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.
‘नमो थाळी’ पुन्हा सेवेत…
माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे सुरू केलेली ‘नमो थाळी’ पुन्हा सुरू करण्यात आली. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना माफक दरात जेवण सुविधा यानिमित्ताने मिळाली आहे. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेविका सुजाता पालांडे, केशव घोळवे, बाबू नायर आदी उपस्थित होते.
अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. प्लाझ्मा दान करणाऱ्या दात्यास महापौर माई ढोरे यांच्या वैयक्तीक निधीतून एक हजार देण्याची घोषणा करण्यात आली. कोरोनावर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
कोविड रुग्णांशी साधला संवाद…
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळेगुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारलेले हे कोविड सेंटर गुरूवारपासून (दि. २२) कार्यान्वित झाले आहे. या कोविड सेन्टरला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत शहराच्या महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेवक सागर आंघोळकर, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, डाॅ. दिनेश फसके, माऊली जगताप आदी उपस्थित होते.
भाजपाच्या १० रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत…
भाजपाचे नगरसेवक आणि माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी १० रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याकामी आमदार महेश लांडगे यांनी योगदान दिले आहे. संबंधित रुग्णवाहिकांचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, माजी महापौर नितीन काळजे उपस्थित होते.
सोसायटीतील नागरिकांसाठी मोफत ॲंटीजन टेस्ट…
भाजपा माध्यमातून शहरातील सर्व सोसायटी मध्ये मोफत ॲंटीजन कोविड टेस्ट शिबीर घेण्याचे अभियान सुरू आहे.
त्या अंतर्गत भोसरी येथील ‘सिल्व्हर सोसायटीतील शिबीरास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी कोविड टेस्ट करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अभिनंदन केले व त्यांना काही सूचना देखील केल्या.