शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये covid-19 लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे युवक पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस योगेश मदन मोरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे
त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की covid-19 चे रुग्ण आपल्या पिंपरी चिंचवड शहरात झपाट्याने वाढत आहे शासनाच्या नियमानुसार एक मेपासून 18 वर्षे वय पूर्ण असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे या वयोगटातील नागरिकांची संख्या आपल्या शहरात जास्त असल्याने लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे लसीकरण केंद्र वर अतिरिक्त भर वाढेल व नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे तरी प्रभाग क्रमांक 10 मध्ये सन्मित्र चौकात साई विरंगुळा केंद्र येथे लसीकरण केंद्र सुरू करावे याठिकाणी नागरिकांना बसण्यास व लस घेतल्यानंतर थांबण्यासाठी ही मोठी जागा उपलब्ध आहे तसेच येथे पिण्याच्या पाण्याची सोय व इतर सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत यामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये covid-19 लसीकरण केंद्र सुरू करावे. असे राष्ट्रवादीचे योगेश मोरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
. या वेळी योगेश मदन मोरे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पि.चि.शहर, स्वप्नील सतीश सराटकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रभाग क्र. १० ,सौ सारिका ताई पवार ( अध्यक्षा एकता प्रतिष्ठान ) , सायमन डेविड ( सामाजिक कार्यकर्ते ) .आदी उपस्थित होते