पुणे, दि. 26 : पुणे विभागातील 9 लाख 36 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 9 हजार 935 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 52 हजार 250 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 21 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.38 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 93 हजार 186 रुग्णांपैकी 6 लाख 79 हजार 335 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 1 हजार 637 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.54 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.65 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 93 हजार 619 रुग्णांपैकी 73 हजार 352 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 112 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 90 हजार 865 रुग्णांपैकी 74 हजार 519 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 765 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 581 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 69 हजार 191 रुग्णांपैकी 55 हजार 710 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 378 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 63 हजार 74 रुग्णांपैकी 53 हजार 646 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 358 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 16 हजार 390 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 10 हजार 193, सातारा जिल्ह्यात 1 हजार 932, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 44, सांगली जिल्ह्यात 1 हजार 150 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 71 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.