शबनम न्यूज / पुणे
महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील उम्मत एक सामाजिक संस्था यांच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालय इमर्जन्सी वार्ड ४० नंबर मध्ये नागरिकांना . ४ पल्स मशीन. १० व्हेंटिलेटर मास आणि ४० चष्मे डोनेशन करण्यात आले,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सामाजिक संस्था व राजकीय संघटना सर्वांना आवाहन केलं होतं की कोविड च्या महा मारी मध्ये सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही दर वेळेला काही ना काही उपक्रम राबवत आहोत आज दिनांक २५/४/२०२१ रोजी ससून सर्वोपचार रुग्णालय इमर्जन्सी वार्ड ४० नंबर मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सीएमो डॉ.पराग वराडे सर. सीएमो डॉ मिथिलेश हरले सर. संस्थापक अध्यक्ष जावेद खान. हसन रंगरेज. जिशान कुरेशी. तैसिफ कुरेशी. गणी शेख.लाला शेख. दानिश अन्सारी. शोएब सुलेमानी.दावल शेख. फिरोज शेख. आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला