आज आपण जाणून घेऊया कुरकुरीत कांदा भाजी बनविण्याची विधी…अगदी हॉटेल मध्ये जशी कुरकुरीत भजी बनते तशी कांदा भजी आपण बनवूया.
घटक –
कांदा, कोशंबीर, हिरवी मिरची, बेसन पीठ, मीठ (चवीनुसार), लाल तिखट पावडर, हळद, धनिया पावडर, ओवा, तेल.
सर्वात प्रथम २ ते ३ कांदे चिरून घ्या.त्या मध्ये थोडीशी कोशंबीर बारीक चिरून टाका. नंतर मीठ (चवीनुसार),लाल तिखट एक चमचा , थोडीशी हळद,धनिया पावडर २ चमचे,एक चमचा ओवा आता या सर्व घटकांचे मिश्रण करून घ्यावे. आता यामध्ये २ मोठे चमचे बेसन पीठ टाका आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे. मिश्रण करताना योग्य तितके पाणी टाकून मिश्रण करून घ्यावे.
यानंतर आता गॅस वर कढाईत तेल टाकून तेल गरम होण्यास ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मिश्रणचे गोळे करून टाकावे. आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यावे. तर आपली छान अशी गोल्डन रंगाची कुरकुरीत भजी तयार झालेली आहे.
अगदी कमी वेळात हॉटेल सारखी कुरकुरीत कांदा भजी आपण हि घरी बनवू शकतो.तर नक्कीच एकदा तरी हि कांदा भजी घरी बनवून पहा .