मुंबई – महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत होती. दिवसाला ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत होती. पण आता कडक लॉकडाऊनचा चांगला असर पडताना दिसत आहे. आज मुंबईसह राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५२४ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर ७१ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा आहे.