पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे यांनी प्लाझ्मादाना साठी केलेल्या आवहानाला तरूणान कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .प्लाझ्मादान दात्याना महापौर सौ.माई ढोरे यांच्या हस्ते 1000/-रू रोख पारितोषिक देण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत तसेच क्जओरॉन रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाजमा थेरपी जीवनदायी ठरत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर सौ. माई ढोरे यांनी प्लाजमा दान करण्यासाठी शहरवासीयांना आवाहन केले होते जे रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांनी 28 दिवसाच्या आत प्लाजमा दान केल्यास सध्याच्या कोरोना बाधित रुग्णास जीवनदान देण्यासाठी ते उपयोगाचे असल्याने प्लाजमा दान मोहिमेला पिंपरी-चिंचवड शहरात सुरुवात झाली या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक प्लाझ्मादान दात्यास महापौर सौ. माई ढोरे यांच्या वतीने एक हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती त्यानुसार प्रत्येक प्लाझ्मा दात्यास महापौर माई ढोरे यांचे हस्ते एक हजार रुपये बक्षीस देण्यात येत आहे या मोहिमेत अनेक तरुणांनी प्लाझ्मा दान करण्यास उत्साह दाखविला आहे या मोहिमेस तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे