पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून वाहतूक नियमनाचे काम करत असलेल्या महिला कर्मचारीस शिवीगाळ करत गचंडी पकडली व कर्मचारी महिलेला मारहाण देखील केली याप्रकरणी प्रल्हाद रामभाऊ कांबळे व अहमद शेख या दोघा जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस महिला कर्मचारी सोमवारी २६ रोजी सकाळी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपले कार्य बजावत असताना अहमद शेख हा रिक्षा विरुद्ध दिशेने चालवत असल्याचे महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले त्यांनी अहमद शेख यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली कागद पत्रांची पूर्तता न केल्या ने अहमद यास पिंपरी वाहतूक विभाग कार्यालयात आणले व कार्यवाही करीत असतांनाच यावेळी प्रल्हाद कांबळे हा येथे आला व महिला कर्मचारी यांचेशी उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली यावेळी वाद वाढत गेला प्रल्हाद कांबळे याने महिला कर्मचाऱ्यांची गचांडी पकडून त्यांचेही गैरवर्तन करत मारहाण केली तसेच शिवीगाळही केली याबाबत भारतीय दंड विधान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.